पराभवाचं खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय ? भाजपच्या ‘या’ खासदाराचं पंकजा मुंडेंवर ‘टीकास्त्र’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे खासदास संजय काकडे हे आपल्याच पक्षावर किंवा आपल्याच पक्षातील नेत्यांवर टीका करताना आपण अनेकदा पाहिलं आहे. परंतू त्यांनी यावेळी पक्षाची पाठराखण तर केली परंतू पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला. ते पंकजा मुंडेंसमोर सवाल उपस्थित करत म्हणाले की पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पक्ष सोडून कार्यक्रम ठेवावा एकही नेता येणार नाही. पंकजा मुंडे यांनी मुंडे कुटुंबांचे अस्तित्व जपावे, पराभवाचे खापर दुसऱ्यांच्या माथी का मारताय? मतदारसंघातील लोकांनी तुम्हाला मतदान केले नाही, चंद्रकांत पाटील कोल्हापूरातून पुण्यात येऊन निवडून आले. तुम्हाला मतदारसंघ सांभाळता आला नाही, बाहेरच्या लोकांनी येऊन मतदान केलं आहे का? 
 
संजय काकडे म्हणाले की, पंकजा मुंडे यांना एवढी पदं देऊन 30 हजारांच्यावर मतांनी पराभूत झाल्या. त्यांच्या मेळाव्याला पक्षाला काही हानिकारक होईल असे वाटत नाही. वैयक्तिक समाधान देणाऱ्या या गोष्टी आहे. ज्यांना स्वत:चे घर, मूठभर मतदारसंघ सांभाळता येत नाही, घरात एक खासदार, मंत्री असताना पराभूत होतात. गोपीनाथ मुंडे यांचे वलय असताना पराभवाला सामोरे जावे लागते. पराभव पचवता येत नाही. पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले.
 
यावेळी संजय काकडेंना पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपपासून ओबीसी समाज दुरावेल असे वाटत नाही हे सांगताना ते म्हणाले की. 50 पेक्षा अधिक भाजप आमदार ओबीसी समाजाचे आहे. पंकजा मुंडे यांचे काल जातीपातीचे राजकारण केले. गेली 5 वर्ष सत्तेत राहून मराठवाड्याच्या दुष्काळासाठी काय केलं? गोपीनाथ मुंडे यांनी तयार केलेले नेते 5 वर्षात पंकजा मुंडे यांच्या कोणत्या व्यासपीठावर दिसले. गेल्या 5 वर्षात कोणत्या समाजातील कार्यकर्त्यांना पंकजा मुंडे यांनी सांभाळले आहे? 
 
यावेळी पंकजा मुंडेंवर संजय काकडे यांनी सवाल देखील उपस्थित केले, ते म्हणाले की पंकजा मुंडे सांगतात की माझ्या बापाचा पक्ष आहे, मग बापाने कारवाई करावी असं वाटतं का? पक्षासाठी गोपीनाथ मुंडेंनी खूप काही केलं. पक्षाने त्यांना तेवढा सन्मान देखील दिला. गोपीनाथ मुंडेच्या जयंतीनिमित्त वेगळा ड्रामा घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. मूठभर घेऊन व्यासपीठावर भाषण केल्याने यामुळे काकडेंनी पंकजा मुंडेंवर टीका केली. 
दरम्यान, पक्षविरोधी कारवाया केलेल्यांची गय केली जाणार नाही, मी जर काल गोपीनाथ मुंडे गडावर गेलो नसतो तर तीव्रता वाढली असती. संवादाने खूप गोष्टी सुटतात. मतभेद असतात, बंड केलेल्यांची उदाहरण सांगितलं बंड स्वकीयांविरोधात करायचं नसतं. आपल्या माणसांविरोधात भांडायचं नसतं चर्चा करायची असते. केंद्रापासून गल्लीपर्यंत खूप कडक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया चालणार नाही. काम चांगलं केलं तर बक्षिसही मिळेल पण पक्षाच्या विरोधात केलं तर शिक्षा दिली जाईल असा सूचक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपमधील नाराज नेत्यांना दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like