संजय काकडे यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आहे. या भेटीचे कारण गुलदस्त्यात असले तरी पुण्याच्या राजकीय वर्तुळाला या बाबत उलट सुलट चर्चांना वेग आला आहे. अशोक चव्हाण यांच्या सोबत संजय काकडे यांची भेट कधी झाले हि निश्चित सांगता येत नसले तरी त्यांच्या भेटीचे फोटो आज लीक झाले आहे असल्याने राजकीय तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

संजय काकडे हे पुण्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढवू इच्छित असून त्यांना कोणत्याही परिस्थिती लोकसभेची निवडणूक लढून लोकसभेत जायचेच आहे. म्हणून भाजप जर तिकीट देत नसेल तर मग आपण काँग्रेसकडून उमेदवारी मागून लोकसभा लढवूया असा संजय काकडे यांचा मानस आहे. मात्र संजय काकडे यांचे दोन डगरीवर पाय ठेवणे त्यांना चांगलेच महागात पडेल अशी शक्यता देखील राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. तर पाच राज्यात भाजपचा पराभव झाल्या नंतर संजय काकडे यांनी माध्यमात दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले होते म्हणून काकडे भाजपवर नाराज आहेत असे हि राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.

अशोक चव्हाण यांची काकडे यांनी भेट घेतली तेव्हा जितेंद्र आव्हाड हि त्यांच्या सोबत असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. तर संजय काकडे यांनी जर पुणे लोकसभा राष्ट्रवादीला सुटली तर राष्ट्रवादीतून हि उमेदवारी मिळवण्याची फिल्डिंग लावली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यंतरी संजय काकडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ही भेट घेतली होती. या सर्व राजकीय हालचालीतून संजय काकडे यांच्या मनात नेमके काय शिजते आहे याचा गंध आता सर्वांनाच येऊ लागला आहे.