भाजपाच्या ‘या’ खासदाराचा शरद पवार आणि अजितदादांवर ‘निशाणा’, खा. सुळेंवरही ‘गंभीर’ आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  परखडपणे वक्तव्य करुन नेहमीच चर्चेत राहणारे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी हे कोणत्या ना कोणत्या आरोपांमुळे ओळखले जाणारे भाजपचे खासदार आहे. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि अजित पवार यांच्या मतभेदावर बोट ठेवलं आहे. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार आणि अजितदादा यांच्यात चांगलेच मतभेद आहेत. दोघांचेही वेगवेगळे विचार आहेत. त्यामुळे या पक्षात अंतर्गत कलह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केवळ शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरच वक्तव्य केलं नाही तर त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांचा सिंगापूर सिटीझनशिप आणि इतर कंपनी व्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.