राहुल गांधी ‘बलात्कारा’बाबत ‘असं’ काय बोलले ? भाजपच्या महिला खासदारांची कारवाईची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात हैद्राबाद आणि उन्नाव सारख्या ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या हा संदर्भ घेऊन झारखंड येथील रॅलीत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी टीका करताना मेक इन इंडिया ऐवजी रेप इन इंडिया झाला असल्याचे विधान केले होते या विधानाला लोकसभेत भाजपच्या खासदारांनी जोरदार विरोध केला आणि यासाठी राहुल गांधींवर कारवाई करण्याची मागणी देखील केली.

राहुल गांधी यांनी संपूर्ण देशातील महिलांचा अपमान केला आहे, महिलांचा बलात्कार करायला या असे विधान देशाच्या इतिहासात कोणी केलेले नाही त्यामुळे आम्ही हा महिलांचा अपमान सहन करणार नाही असे केंदीय मंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत ठणकावून सांगितले.

शुक्रवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच इराणी यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा मुद्दा उचलला आणि भाजपच्या महिला खासदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. बलात्काऱ्याला कायद्यानुसार शिक्षा होतेच परंत्तू अशी मंडळी देखील संसदेत आहेत जी ‘मेक इन रेप इंडिया’ असे बोलून बलात्काराला प्रोत्साहन देतात अशा शब्दात इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

अशा वक्तव्याबाबत राहुल गांधी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी देखील मागणी यावेळी स्मृती इराणी यांनी केली. गेल्या शुक्रवारी देखील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी बलात्काराचा मुद्दा संसदेत मांडला होता. यावेळी बोलताना एकीकडे राम मंदिर उभारले जात आहे तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचे काम होत आहे अशा शब्दात त्यांनी सध्या देशात होणाऱ्या घटनांवरून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तर बलात्काराचे राजकारण करू नका दोषींना फाशी मिळायला हवी अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली होती.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like