BJP Narottam Mishra | भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान; म्हणाले; ‘शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP Narottam Mishra | बिल्किस बानो सामुहिक बलात्कार आणि खून (Bilkis Bano Gang Rape And Murder Case) प्रकरणातील 11 आरोपींची सुटका केल्याप्रकरणी परखड मत केल्याने एका भाजपा नेत्याने बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi), गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar)आणि अभिनेता नसरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्याबाबत अतिशय धक्कादायक वक्तव्य केले आहे. हे तिघे तुकडे-तुकडे गँगचे एजंट असल्याचा गंभीर आरोप मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपा नेते नरोत्तम मिश्रा (BJP Narottam Mishra) यांनी केला आहे. ते फक्त भाजपाशासित राज्यांमधील मुद्द्यांवर भाष्य करतात असे मिश्रा याने म्हटले आहे.

 

 

बिल्किस बानो प्रकरणी आरोपींची 15 वर्षानंतर कारागृहातून सुटका झाल्यानंतर शबाना आझमी यांनी जोरदार टीका केली आहे. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. मला प्रचंड लाज वाटत आहे. याशिवाय माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही, असे शबाना आझमी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले होते. तसेच गीतकार जावेद अख्तर यांनीही या प्रकरणी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. यावरून नरोत्तम मिश्रा यांनी म्हटले की, शबाना आझमी, नसरुद्दीन शाह आणि जावेद अख्तर हे स्लीपर सेल असणार्‍या तुकडे-तुकडे गँगचे एंजट आहेत, ते फक्त भाजपाशासित राज्यांमध्ये घडणार्‍या घटनांवर वाद निर्माण करतात. (BJP Narottam Mishra)

नरोत्तम मिश्रा यांनी म्हणाले, राजस्थानमध्ये कन्हैय्यालालची हत्या झाली किंवा झारखंडमध्ये महिलेला जिवंत जाळले
यावर शबाना आझमी काही भाष्य करत नाहीत. तुकडे-तुकडे गँग किंवा अवॉर्ड वापसी गँगला हे अजिबात दिसत नाही.
यावरुन त्यांची वाईट विचारसरणी उघड होत आहे. कोणीही त्यांना सुसंस्कृत किंवा धर्मनिरपेक्ष कसे काय म्हणू शकते?

 

शबाना आझमी यांनी नुकतंच बिल्किस बानो प्रकरणातील 11 आरोपींची सुटका करण्याच्या निर्णयाविरोधात
महिला संघटना आणि विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

 

Web Title :- BJP Narottam Mishra | bjp narottam mishra says shabana azmi naseeruddin shah javed akhtar as agents of sleeper cell tukde tukde gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा; राजकीय चढाओढीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप

 

Pune News | बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना आगीतून फुफाट्यात जाण्याची भिती

 

Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’