भाजपाच्या ‘या’ नेत्याला मिळणार प्रियंका गांधींचा दिल्लीतील ‘बंगला’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच भाजपाचे राष्ट्रीय प्रसारमाध्याचे प्रमुख आणि राज्यसभा सदस्य अनिल बालुनी यांनी हा बंगला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. गांधी यांना1 ऑगस्टपर्यंत हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे.

प्रियंका गांधी यांचा बंगला अनिल बलुनी यांना देण्यात आला आहे. गांधी यांनी बंगला रिकामी केल्यानंतरच अनिल बलुनी यांना त्याचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे. बलुनी यांनी आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव हा बंगला देण्याची विनंती केली होती. काही काळापूर्वी त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. बलुनी यांना सध्या कोणताही त्रास होत नसला तरी डॉक्टरांनी त्यांना अनेक गोष्टींची काळजी घेण्यास सांगितले आहे. सध्या ते राहत असलेल्या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध नसल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.

23 वर्षांपूर्वीच प्रियंका गांधी यांना लोधी इस्टेटमधील हा बंगला देण्यात आला होता. तेव्हा त्यांना एसपीजी संरक्षण देण्यात आले होते. प्रियंका गांधी या बंगल्यासाठी 37 हजार रुपये महिना भाडे देत होत्या. त्यानंतर एसपीजी सुरक्षा नाही त्यांना बंगल्या देण्यात येणार नसल्याचा नियम तयार करण्यात आला होता. यापूर्वी या श्रेणीतील बंगल्यांना बाजारभावापेक्षा 50 टक्के अधिक भावानक भाडेतत्त्वार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.