भाजप-राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला विराम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Nationalist Congress Party) २२ वा वर्धापन दिन (Anniversary) साजरा केला. राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत (BJP) जाईल, अशी चर्चा होत होती. यावर राष्ट्रवादीच्या ncp सर्व प्रमुख नेत्यांनी २२व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भाजपवर सडेतोड टीका केली. पक्षाचे प्रमुख नेते खा. प्रफुल्ल पटेल (Eat party leaders. Praful Patel), उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil) यांच्यासह अनेकांनी भाजपवर टीका केली, तर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Party President Sharad Pawar) यांनी शिवसेनेची (Shiv Sena) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. त्यांचे स्वातंत्र्य किती आहे. त्यांच्यावर कशा प्रकारे दबाव टाकला जातो. भाजपची सत्ता आल्यापासून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता विचारांना धक्का देण्याचे काम सुरू आहे. लोकशाही (Democracy) टिकवून ठेवणाऱ्या संस्था मोडीत निघाल्या. सगळे पत्रकार एकाच सुरात, एकाच भाषेत कसं ट्विट करतात, हे बघितल्यावर लोकशाही संकटात आल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

देशातील सर्वात अनुभवी नेते
राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे राजकीय (Political) वजन वाढवण्याचे काम आपल्याला करायचे आहे.
देशात अनेक राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांनी देशाच्या राजकारणात उलथापालथ होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
अशावेळी देशपातळीवर व्यापक व्यासपीठावर शरद पवार (Sharad Pawar) यांची मोठी गरज लागणार आहे.
से सांगून खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (ncp) तर स्थापनेपासूनच सत्तेत राहिला.
आपले नेते हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत.
त्यामुळे त्यांना ताकद देऊन त्यांच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) उभा करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता आणली.
त्यांच्या वेगळ्या पक्षाची सुरुवात त्यांच्यासह अजून केवळ तीन आमदारांनी झाली होती.
पण, त्यांनी कठोर संघर्ष करून त्यांच्या पक्षाला आज इतके पुढे आणले आहे.

पक्षाने आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिकवले

दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकला नाही.
अशा शब्दांत राष्ट्रवादीचे ncp प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली.
राजकीय आयुष्य जगताना ते स्वाभिमानाने व सर्वधर्मसमभावाने कसे जगावे.
हे आपल्याला पक्षाने आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिकवले, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

… त्याचीही कार्यक्रमस्थळी चर्चा
खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) पक्ष कार्यालयाच्या समोर कार्यकर्त्यांसाठी टाकण्यात आलेल्या खुर्चीवर कार्यक्रम संपेपर्यंत बसून होत्या.
त्याचीही कार्यक्रमस्थळी चर्चा होती.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil), खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare), गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Housing Minister Jitendra Awhad), सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde), अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या (corona) काळात राजेश टोपे (Rajesh Tope) उत्तम काम करीत आहेत.
स्वतःची क्षमता त्यांनी या संकटकाळात सिद्ध केली आहे.
से गौरवोद्गारही शरद पवार यांनी काढले.
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Co-operation Minister Balasaheb Patil), औषध व अन्न प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Drug and Food Administration Minister Dr. Rajendra Shingane), राज्यमंत्री संजय बनसोडे (Minister of State Sanjay Bansode), कोषाध्यक्ष हेमंत टकले (Treasurer Hemant Takle) यांच्यासह विविध सेलचे प्रमुख नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

Ajit Pawar | यंदाही पायी वारी अन् विठ्ठल दर्शन नाहीच; देहु-आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी, अजित पवार यांची माहिती

NCP | … म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याची चिंता नाही – शरद पवार

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखांपर्य़त मिळणार बिनव्याजी कर्ज

Wab Title :- bjp ncp talks pause criticism bjp anniversary praise shiv sena