
रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे (BJP) माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती ? अशी जळजळीत टीका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
CM उद्धव ठाकरे घेणार मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट; मराठा आरक्षणावर होणार चर्चा
अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2021
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांना अजित पवार यांनी लक्ष्य केलं होतं.
यावरुन निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवारांना ट्विटच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
PM नरेंद्र मोदी आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार
काय म्हणाले निलेश राणे ?
अजित पवार वाटेल तसं बडबडत असताता त्यात काही नवीन नाही.
पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत.
त्यांचा आवाका मोजण्याचे धाडस अजित पवारांनी करु नये.
मराठ्यांचा अपमान करु नका,
पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.
–
अजित पवार काय म्हणाले होते ?
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर अजित पवार यांनी टीका केली होती.
काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात.
कायदा आणि संविधान बघत नाहीत.
ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती.
त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार म्हणाले होते.
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय
तुमच्या स्मार्टफोनवर ‘गुगल’ कोणत्या गोष्टींना करत आहे रेकॉर्ड, मिनिटात ‘या’ पद्धतीने जाणून घ्या