बाळासाहेबांचे ‘विचार’ राज ठाकरेच ‘पुढे’ नेऊ शकतात, भाजपाच्या आमदारानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत महाअधिवेश घेऊन आपल्या पक्षाच्या नव्या झेंड्याचे अनावरण केले. भगव्या रंगातील असलेल्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. त्यामुळे मनसे हिंदुत्वाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. यावर टिका होत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊ शकतात असे म्हणत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. भाषण करून अंतरंग भगवा होत नसल्याचा टोला देखील नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

बाळासाहेबांच्या विचारावर पहिल्या अर्थाने जे चालत होते ते राजसाहेबच होते. कडवट शिवसैनिकांना विचाराल तर ते देखील राज ठाकरे यांचेच नाव घेतील. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्यांच्यासाठी साजेसी आहे. राज ठाकरेच बाळासाहेबांचे विचार पुढे नऊ शकतात असे सांगत नितेश राणे यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच बाळासाहेबांच्या जयंती दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्यापैकी कुणीही बाळासाहेबांना अभिवादन केले नाही. हे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना मान्य आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. संजय राऊत काही बोलले तर दिल्लीवरून फोन येतो आणि ते शब्द मागे घेतात, असा टोला त्यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे कौतुक करताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. शब्दापलीकडे जाऊन कृतीतून तुम्ही काय करत आहात हे सगळ्यांना दिसत आहे. संजय राऊत सकाळी एक आणि रात्री एक बोलतात. तुम्ही पारंपारिक मतदारांची फसवणकू करत असून महाविकास आघाडीमध्ये तुमची गळचेपी आणि अपमान होताना दिसत असल्याचे राणे म्हणाले. तसेच आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना कुठे ही दिसणार नाही. तेव्हा उद्धव ठाकरे यांना कोणाचं किती भगवं राहिलं आहे समजेल.

फेसबुक पेज लाईक करा –