‘पंतप्रधानांनी आत्मचिंतन करावं’ ! नितीन गडकरींचा ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी आंदोलनावरून राज्यसभेत भाषण केले होते. त्या भाषणात त्यांनी म्हटले की, कृषी सुधारणावर बोलणारे सत्तेत असताना या कायद्याच्या बाजूने बोलत होते, आता राजकारणासाठी विरोध करत आहेत. देशात आंदोलन करत आहेत, देशात आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे, त्यांना आंदोलन केल्याशिवाय जमत नाहीत असं विधान त्यांनी केलं होत. यासंदर्भात आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे,

 

 

https://twitter.com/Naveen_congress/status/1359151264639160328

 

 

 

दरम्यान, पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मात्र या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानाची चर्चा होताना दिसत आहे. मात्र ज्यावेळी डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते. तर हा व्हिडीओ काँग्रेसची सत्ता असतानाचा आहे.

नितीन गडकरींच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत काय?

गडकरी व्हिडिओमध्ये म्हणतात की, पंतप्रधान जे बोलत आहेत ते लोकशाहीच्या विरोधात आहे, या देशात भ्रष्ट नेत्यांविरोधात, सरकारविरोधात आंदोलन करणं घटनेनं दिलेला अधिकार आहे, येथील जनतेचा अधिकार आहे, हा अधिकार काँग्रेस पक्ष किंवा पंतप्रधानांनी दिला नाही, तर संविधानाने दिला आहे. मुलभूत अधिकार, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, शांततेत लोकांनी आंदोलन करू नये हे पंतप्रधान कोणत्या आधारे बोलू शकतात. पंतप्रधानांचे म्हणणं कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का? संविधानाच्या चौकटीत पंतप्रधान हे बोलू शकतात का? याचं पंतप्रधानांनी आत्मचिंतन करणं गरजेचे आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधानांच्या विधानावरून अनेक विरोधकांकडून प्रतिक्रिया उमटत असतांनाच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलं होतं, विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंदू है, या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है, जय जवान- जय किसान असं म्हणत त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या भेटीचा फोटोसोबत जोडला होता.