BJP खासदाराची MIM च्या ओवैसींना ‘धमकी’, म्हणाले – ‘क्रेनला उलट लटकावून तुमची दाढी कापणार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणामधील निजामाबाद येथील भारतीय जनता पक्षाचे खासदार धरमपुरी अरविंद यांनी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन ( AIMIM ) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्याविरोधात अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. भाजप खासदार धरमपुरी अरविंद यांनी धमकी देणाऱ्या स्वरात सांगितले की, ‘मी तुम्हाला (असदुद्दीन ओवैसी) चेतावणी देतो की, क्रेनवरून उलट लटकावून तुमची दाढी कापून टाकेल. यानंतर मी तुमची दाढी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना लावून त्यांचे प्रमोशन करेल.’

निजामाबादचे भाजप खासदार धरमपुरी अरविंद यांनी यापूर्वीही हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले होते. गेल्या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात भाजपचे खासदार धरमपुरी अरविंद यांनी असदुद्दीन ओवैसी यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा विरोध केल्याबद्दल लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते, ‘असदुद्दीन ओवैसी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास घटनाबाह्य आणि जातीय म्हणून विरोध करीत आहेत. मी विचारतो की ओवेसी यांना पाकिस्तान आणि बांगलादेशमधून निवडणूक घ्यायची आहे का ? भाजपचे खासदार धरमपुरी अरविंद म्हणाले की असदुद्दीन ओवेसी सतत देशात फूट पडण्यासारखी विधाने करत आहेत’.

हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यास सतत विरोध करत आहेत. तसेच त्यांनी संसदेत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा मसुदा फाडला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला. नागरिकता दुरुस्ती कायदा असंवैधानिक असल्याचे वर्णन करत त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही त्याला आव्हान दिले आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा भारतातील नागरिकांवर कोणताही परिणाम होणार नाही. नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आणला आहे. यातून कोणचेही नागरिकत्व गमावणार नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/