भाजपकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी किसन कथोरेंचा अर्ज

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारून काही तासच झाले असताना आता विरोधी पक्षात असलेल्या भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. विधानसभा अध्यक्षाचे निवडीसाठी भाजप आपला उमेदवार उतरवणार असल्याचे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधासभा अध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टी मुरडबादचे आमदार किसन कथोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात केली असल्याची टीका देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

आज पर्यंत प्रथेप्रमाणे आधी अध्यक्षांचा निवड होत असे मात्र शपथ घेतल्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवायला सुरुवात झाली आहे. तसेच ज्या प्रकारे शपथविधी सोहळा पार पडला तो बेकायदेशीर होता याबाबत राज्यपालांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली होती. हा शपथ विधी रद्द समजावा अशी याचिका आज राज्यपालांकडे दाखल केली जाणार आहे अशी माहिती देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

या आधी विधासभा अध्यक्षांची निवड ही गुप्त पद्धतीने व्हायची मात्र आता ही निवड खुल्या मतदानाने केली जाणार आहे. महाविकास आघाडीकडे बहुमत आहे तर ते एवढे कशाला घाबरतात ? त्यांनी अजूनही आमदारांना हॉटेलमध्ये डांबून का ठेवले आहे ? अशा परकरचे असनेक प्रश्न नवनिर्वाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मोठ्या मनाने आम्ही मुख्यमंत्र्यांना स्वीकारले आहे त्यामुळे त्यांनी नियमात काम करावे कारण नियमबाह्य काम हा विरोधी पक्ष करून देणार आहे असे स्पष्ट मत देखील चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Visit : Policenama.com