शिवसेनेला पुन्हा डच्चू, मोदींच्या पुण्यातील कार्यक्रमाचं उद्धवना निमंत्रण नाहीच ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमाला युतीतला सहकारी पक्ष शिवसेनेला अद्याप निमंत्रण देण्यात आले नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला पुण्यातील कार्यक्रमाच निमंत्रण न दिल्याने शिवसेनेला डच्चू दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यमध्ये बुधवारी महाराष्ट्रातील विकास प्रकल्पावर चर्चा झाली. यावेळी पुण्यातील होणाऱ्या विकास प्रकल्पाच्या भूमीपूजन सोहळ्यात शिवसेनेला सहभागी करावे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली होती. मात्र, त्यास अजून पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत मंजूरी दिली नाही. त्यामुळे या कार्यक्रमावरुन युतीमध्ये आणखी बाद होण्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत.

विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी याआधीही भाजपने शिवसेनेला लांब ठेवलं होतं. त्याप्रमाणे आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरही भाजपची हीच रणनीती असणार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 18 डिसेंबरला होणाऱ्या विकास प्रकल्पांच्या भूमीपूजन सोहळ्यासंदर्भात कोणतंही अधिकृत निमंत्रण शिवसेनेला मिळालं नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावर युतीत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमाला अजूनही काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शिवसेनेला निमंत्रण दिलं जातं का, हे पाहावं लागेल.