जगनमोहन रेड्डींच्या खुलाशानंतर शिवसेनेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत

हैद्राबाद : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा मित्र असलेल्या शिवसेनेने लोकसभेचे उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपाने वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षदाची ऑफर दिल्याने शिवसेना नाराज झाली होती. परंतु आता वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांनी आपल्याला अशी कोणतीही ऑफर देण्यात आली नसल्याचा खुलास केला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या या खुलाशामुळे शिवसेनेच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.

लोकसभेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्यावर सहयोगी मित्रांचा मंत्रीमंडळात समावेश करून घेतला. शिवसेनेला आपेक्षेप्रमाणे मंत्रीपद न मिळाल्याने शिवसेनेने लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपाने दक्षिणेत पक्ष विस्तार करण्यासाठी हे पद वायएसआर काँग्रेसला देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र जगन मोहन रेड्डी यांनी खुलासा केल्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी करु शकते. भाजपाने या आधी अण्णा द्रमुकच्या थंबीदुरई यांना हे पद दिले होते.

राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. या मंत्रीमडळात शिवसेना आणि मित्रपक्षांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे प्रतिनिधीत्व मिळेल असे अर्थमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळी अधीवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात काही जागा शिल्लक असून शिवसेनेच्या वाट्याला किती जागा मिळतात हे लवकरच समजेल.

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ