BJP OBC Chakka Jam Andolan । भाजपच्या आंदोलनात ‘काँग्रेसने’ लावले ‘खडसे, मुंडे, तावडेंचे बॅनर (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BJP OBC Chakka Jam Andolan |ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून (OBC reservation) राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांस जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसी आरक्षण नसल्याने भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज (26 जून) रोजी राज्यभर भारतीय जनता पार्टीच्या (BJP) वतीने चक्काजाम आंदोलन (BJP OBC Chakka Jam Andolan) करण्यात येत आहे.khadse munde tawade remember sacrifice congress puts banner on bjps banner at nagapur

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

तर नागपुरात देखील जोरदार चक्का जाम आंदोलनाची तयारी केलीय. मात्र, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे (eknath khadse), भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde),माजी मंत्री विनोद तावडे (Vinod Tawde) या ओबीसी नेत्यांसोबत भाजपने काय केलं? या पद्धतीचा बॅनर भाजपच्या बॅनरवर लावला आहे. यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.(In the BJP’s agitation, ‘Congress’ planted banners of Khadse, Munde and Tawde)

नागपूर येथील व्हेरायटी चौक येथे भाजप (BJP) चक्का जाम आंदोलन करत आहे. मुख्यतः म्हणजे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात हे चक्काजाम आंदोलन होत आहे. यासाठी मोठया संख्येने भाजपचे (BJP) कार्यकर्ते आंदोलन ठिकाणी जमले आहे. यादरम्यान तेथील उड्डाणपुलावर भाजपने चक्का जाम आंदोलनाचे मोठा बॅनर लावला. मात्र त्याच बॅनरवर युवक काँग्रेसचे नेते अक्षय अरुण हेटे यांनी एक वर बॅनर लावला आहे.

त्यांनी लावलेल्या बॅनरवर एकनाथ खडसे (eknath khadse), पंकजा मुंडे (pankaja munde),, विनोद तावडे (Vinod Tawde) तसेच, सुधाकर कोहळे (Sudhakar Kohle) यांचे फोटो आहेत. भाजपने या ओबीसी नेत्यांसोबत काय केले असा सवाल देखील केला आहे. दरम्यान, या नेत्यांच्या फोटोवर ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी’ असा मजकूरही लिहिण्यात आला आहे.

तर, युवक काँग्रेसने लावलेल्या बॅनर या मुद्यावर भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. तर भाजपच्या एका कार्यकर्त्याने पुलावर जाऊन हे बॅनर काढून टाकले आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हे बॅनर जप्त केले. परंतु, घडलेल्या प्रकारामुळे आंदोलनात गोंधळ उडाला आहे. या दरम्यान, पुण्यामध्ये भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) ह्या आंदोलनात सहभागी होत्या. तर परळीमध्ये भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्या उपस्थितीत चक्काजाम आंदोलन सुरूय. चक्काजामला जाण्याआधी खा. प्रीतम मुंडे यांनी ओबीसीचे नेते स्व गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

दरम्यान, राज्य सरकारनेओबीसी अरक्षणासंदर्भात योग्य निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन तीव्र असेल असा इशारा डॉ. मुंडेंनी (Pritam Munde) म्हटलं.
बीड जिल्ह्यात तब्बल 24 ठिकाणे चक्का जाम आंदोलन होत आहे.
यावरून मोठा पोलिस बंदोबस्त केला असून आंदोलनामध्ये काही भलताच प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्याचे प्रशासनाकडून सांगितलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : khadse munde tawade remember sacrifice congress puts banner on bjps banner at nagapur

हे देखील वाचा

Pune Unlock | पुणे महापालिकेकडून नवीन नियमावली जाहीर ! सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच, जाणून घ्या काय सुरू आणि काय बंद

Natural Gas Price | 1 ऑक्टोबरला ठरणार घरगुती गॅसच्या नवीन किंमती; दर 60 टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता : ONGC

Burglary in Pune | नर्‍हे परिसरातील गोडाऊन फोडून 62 लाखाचा माल लंपास, सिंहगड रोड पोलिसांकडून एकाला अटक