BJP OBC Chakka Jam Andolan | पुण्यात कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी चक्कजाम आंदोलन करणार्‍या 100 ते 150 जणांवर गुन्हा; पंकजा मुंडे, खा. गिरीश बापट होते उपस्थित (व्हिडिओ)

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (policenama online) – पुण्यात भाजपनं ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या चक्काजाम आंदोलनाला (BJP OBC Chakka Jam Andolan) प्रचंड गर्दी झाल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) आयोजकांसह 100 ते 150 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनाला माजी मंत्री पंकजा मुंडे (Former Minister Pankaja Munde) , खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांच्यासह आमदार (MLA) आणि भाजपचे प्रमुख नेते (BJP Leader’s) उपस्थित होते. FIR against 100 to 150 Chakkajam agitators for violating corona rules in Pune; Pankaja Munde, MP Girish Bapat was present

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे (Yogesh Pingle), आयोजक दीपक माने (Deepak Mane) , ओंकार माळवदकर (Omkar Malvadkar), शंतनू नरके, यशोधन आखाडे, अतुल चाकणकर, तुषार रायकर, दिनेश नायकू यांच्यासह 100 ते दीडशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार संतोष भापकर यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली आहे.

राज्यात आज भाजपच्या वतीने ओबीसी आरक्षण व इतर मागण्यांसाठी आंदोलन केले करण्यात आले आहे. पुण्यात कात्रज चौकात (Katraj Chowk) हे चक्काजाम आंदोलन पार पडले. या आंदोलनाला माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट यांच्यासह शहरातील सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते. तर आंदोलनाला प्रचंड गर्दी देखील झाली होती.

दरम्यान आंदोलनाचे आयोजक हे ओबीसी मोर्चा पुणे शहरचे अध्यक्ष योगेश पिंगळे व दीपक माने हे होते.
या आंदोलनाची परवानगी घेण्यात आली होती.
पोलिसांनी 50 पेक्षा जास्त लोक न जमवता आणि कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करण्याबाबत सूचित केले होते.
तर 149 नुसार नोटीस दिली होती. मात्र आंदोलनाला मोठी गर्दी झाली.
त्यात सोशल डिस्टसिंग न पाळणे, मास्क नसणे तसेच रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी करत मनपा आयुक्तांचे आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात आल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update 

Web Title :- BJP OBC Chakka Jam Andolan | FIR against 100 to 150 Chakkajam agitators for violating corona rules in Pune; Pankaja Munde, MP Girish Bapat was present

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांच्या ‘या’ 7 मागण्या होणार पुर्ण? महागाई भत्त्याचा देखील समावेश, जाणून घ्या

Pune Curfew | राज्यात डेल्टा+ व्हेरिएंटनं प्रचंड खळबळ ! पुण्यात सायंकाळी 5 नंतर संचारबंदी, जाणून घ्या काय सुरू अन् काय बंद

Delta Plus variant । ‘डेल्टा व्हेरिएंट’ कोरोनाचा सर्वाधिक संक्रमण होणारा प्रकार; WHO ने दिला इशारा (व्हिडीओ)