पैशाच्या वादातून मित्राचा खून, भाजपचा पदाधिकारी अटकेत 

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – पैशाच्या देवाण घेवाणीतून झालेल्या वादात मित्राची हत्या केल्याचा प्रकार जालन्यात समोर आला आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या शहर उपाध्यक्षाला अटक केली आहे.

कुमार झुंजूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर विजय मुंगसे असे अटक करण्यात आलेल्या भाजपच्या औबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

जालना शहरातील जिनिंग किल्ला परिसरात एका तरुणाचा मृतदेह पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करत त्याची ओळख पटवली आणि खून करणाऱ्या विजय मुंगसे याला बेड्या ठोकल्या. विजय मुंगसे आणि मयत कुमार झुंजूर हे मित्र होते. कुमारकडे विजयने १ लाख २० हजार रुपयांची रोकड ठेवण्यासाठी दिली होती. मात्र ती परत देण्यास कुमार टाळाटाळ करत होता. त्यानंतर तो टाळाटाळ करू लागल्याने विजय मुंगसे याने त्याचा खून केला.