धक्‍कादायक ! तीन तलाकवर भाजपा आमदाराचे ‘वादग्रस्त’ वक्‍तव्य, वेश्याव्यवसायाशी जोडलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेत तिहेरी तलाक कायदा मंजूर झाल्यानंतर आता विविध स्तरातून याविषयी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ओडिशाच्या भाजपमधील आमदाराने या विषयी एक वादग्रस्त विधान करून वाद ओढवून घेतला आहे. तिहेरी तलाक या कायद्यामुळे मुस्लिम महिलांना वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त व्हावे लागत आहे. त्याच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. विष्णू सेठी असे या आमदाराचे नाव आहे.

सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होत असताना ते मात्र आपल्या विधानावर ठाम आहेत. याविषयी बोलताना त्यांनी म्हटले कि, मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. त्याचबरोबर अनेक रिपोर्टमध्ये दावा देखील करण्यात आला आहे कि, तीन तलाक मुळे महिलांना वेश्याव्यवसायात ढकलले जाते. भाजपच्या या आमदाराने केलेल्या विधानावर भाष्य करताना काँग्रेसचे आमदार नरसिंह मिश्रा यांनी म्हटले कि, भाजप हा एक जातीयवादी पक्ष असून या पक्षाचे नेते संसदेत देखील सर्वांना बदनाम करण्याचे प्रयत्न करत असतात. भाजप हा जातीयवादी पक्ष असल्याने ते नेहमी अशा प्रकारचे वाद निर्माण होतील अशी  विधाने करत असतात. त्यांच्या या विधानांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात सांप्रदायिक वाद होतात.

दरम्यान, संसदेच्या दोन्ही सभागृहात तीन तलाक विधेयक मंजूर झाले असून राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याचे कायद्यात रूपांतर देखील करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे मुस्लिम पुरुषांना यापुढे तीन्दाने तीन वेळा तलाक म्हणून आपल्या पत्नीला घटस्फोट देता येणार नाही. जर असा प्रयत्न केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई केली जाईल.

आरोग्यविषयक वृत्त –