मध्य प्रदेशात सत्तास्थापनेसाठी भाजपकडून फोडाफोडी, ५०-६० कोटींची ऑफर, बसपा आमदाराचा आरोप

भोपाळ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणूकीत भाजपला मध्यप्रदेशात घवघवीत यश मिळाले. त्यानंतर राज्यातील कॉंग्रेस सरकार पाडून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत. भाजपने फोडा फोडी सुरु केली असून ५०-६०कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा आरोप मध्यप्रदेशातील बसप आमदार रमाबाई यांनी केला आहे.

मध्यप्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकांत काही महिन्यांपुर्वी भाजपची सत्ता गेली. कॉंग्रेसने सरकार स्थापन केले. त्यानंतर लोकसभा निवडणूकीत भाजपला राज्यात मोठं यश मिळाले. भाजपने कॉंग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपला समर्थन देण्यासाठी आमदारांना कोट्यवधी रुपयांच आणि मंत्रिपदाचं अमिष दाखवून प्रत्येक आमदाराला भाजपकडून ऑफर दिली जात आहे. प्रत्येक आमदाराला ५० ते ६० कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. असा आरोप रमाबाई यांनी केला आहे.

भाजप आमदारांसाठी ऑफर दिली जात आहे. केवळ मुर्खच त्यांची ही ऑफर स्वीकारतील. मला फोन आले. त्यावेळी मंत्रिपद आणि पैशांची ऑफर देण्यात आली. मी ती नाकारली. असे त्यांनी सांगितले आहे.