BJP On Sharad Pawar | ‘शरद पवारांचा ‘जुम्मा’ असल्याने नॉनव्हेज खाल्ल्याचं सांगून दगडूशेठच्या मंदिरात जाण्यास नकार दिला’; भाजपचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP On Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती मंदिराला (Dagdusheth Halwai Ganpati Temple Pune) भेट दिली. यावेळी पवार यांनी दगडूशेठचे दर्शन घेतले नाही. ‘आज मी मांसाहार (Non-Veg) खाल्ल्याने मंदिरात जाणार नाही,’ असं त्यांनी त्यावेळी सांगितलं. यावरुन आता राज्यात मोठी चर्चा रंगु लागली आहे. अशात मनसेकडून (MNS) शरद पवारांवर टीका केली जात असतानाच आता भाजपनेही (BJP) त्यात उडी घेतली आहे. (BJP On Sharad Pawar)

 

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यावेळी बोलताना तुषार भोसले म्हणाले, ”आज आपल्याला दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात जायचे आहे, हे माहिती असूनही शरद पवार यांनी नॉनव्हेज (Non-veg) कसं खाल्लं ? शरद पवार यांची हिंदू देवी – देवतांवर श्रद्धाच नाही. त्यामुळे ते मंदिरात जातीलच कसे ?, मौलाना शरद पवार यांचा काल जुम्मा होता, त्यामुळेच त्यांनी नॉनव्हेज खाल्ल्याचे कारण देत मंदिरात जाण्यास नकार दिला.” अशा शब्दात पवार यांच्यावर टीका केली आहे. (BJP On Sharad Pawar)

पुढे तुषार भोसले म्हणाले, ”एरवी शरद पवार हे इफ्तार पार्ट्या झोडत फिरत असतात.
पण दगडुशेठच्या मंदिरात जाण्याची पवारांना ऍलर्जी आहे.
त्यांनी कितीही कारणे दिली तरी शरद पवार हे नास्तिक आहेत, ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.” असं ते म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांनी दगडूशेठचे दर्शन न घेतल्याच्या मुद्द्यावरुन भाजप आणि मनसेंनी टीकेची झोड उठवली आहे.
त्यामुळे आता भाजप आणि मनसेला राष्ट्रवादीकडून (NCP) काय प्रत्युत्तर येते हे पाहावे लागणार आहे.

 

Web Title :- BJP On Sharad Pawar | bjp adhyatmik aghadi chief tushar bhosale over ncp chief sharad pawar not take blessing of dagdusheth ganpati temple pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा