BJP On Supriya Sule | ‘काय सांगू माझ्या पप्पांची महती…’ ! सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ पोस्टवर भाजपची टोलेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP On Supriya Sule | पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात (भाजपा – BJP) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी नगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले होते. बावनकुळे यांच्या विधानावरुन राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (BJP On Supriya Sule) यांनी ट्विटरवर हेरंब कुलकर्णी यांची कविता पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. यानंतर आता भाजपने एक कविता ट्विट करुन सुप्रिया सुळे यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या पोस्टला रिपोस्ट करुन भाजपने म्हटले, दहा कोटींची वांगी…उगवते माझ्या शेतात…कोणती ही मशागत?…चर्चा जनमाणसात…, बारा बॉम्बस्फोटांनी मुंबईकर हादरला…’ते’रावा स्फोट माझ्या पप्पांनी घडवला…अतिरेक्यांच्या मैफिलीत अवघा ‘शरद’ बहरला…

आम्हा, बाप – लेकीला, आस एक लावसाची…जमीन लाटून कष्टकऱ्यांची…माडी उभारू ‘शरदचंद्रा’ची…राजकीय कारकिर्द 53 वर्षाची…हौस भारी बिरुदे मिरवण्याची…काय सांगू माझ्या पप्पांची महती, जिथे तिथे फक्त खंजीरच खुपसती…, अशा शब्दात भाजपने टोलेबाजी केली आहे.

https://x.com/supriya_sule/status/1706876186717278430?s=20

सुप्रिया सुळेंच्या कवितेत काय म्हटले?

सुप्रिया सुळेंनी (BJP On Supriya Sule) पोस्ट केलेल्या हेरंब कुलकर्णींच्या कवितेमध्ये बावनकुळेंच्या वक्तव्यावर
टोलेबाजी केली आहे. चला, आपण धाब्यावर जाऊ…मी त्यांना म्हणालो, पाण्यात तरंगणारे तुमचे नागपूर शहर आपण पाहू…तर ते म्हणाले नको नको, त्यापेक्षा आपण, धाब्यावरच जाऊ…, असं या कवितेचं पहिलं कडवं आहे.

धाब्यावर जाताच, मी म्हणालो… दारू दुकाने वाढवण्याची, निषेधार्ह बातमी दाखवू का?
ते म्हणाले “हवी ती चव आत्ता तुम्हाला चाखवू का?” मी विचारले सहजपणे, समृध्दी महामार्गावर, अपघात का बरे वाढले?
प्रश्न दाबायला त्यांनी मग पाकीटच बाहेर काढले…, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी कवितेच्या माध्यमातून केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil On Maratha Reservation | मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा ! 40 दिवसांचा वेळ दिलाय, आरक्षण घेतल्याशिवाय…

Maharashtra MLA Disqualification Case | विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाचा आक्षेप, म्हणाले – ‘नार्वेकरांचे वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा’

Nitesh Rane On Vijay Wadettiwar | ‘विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार हिवाळी अधिवेशनापर्यंत कदाचित मंत्री होतील’ – भाजप आमदार