BJP on Thackeray Government | भाजपचा ठाकरे सरकारवर घणाघात; म्हणाले – ‘मध्य प्रदेशला जमलं ते राज्य सरकारला का जमलं नाही ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – BJP on Thackeray Government | मागील अनेक दिवसांपासून मध्य प्रदेशमधील ओबीसीच्या राजकीय आरक्षण (Madhya Pradesh OBC Reservation) बाबत लढत सुरू होती. अखेर ती लढत थांबली आहे. ओबीसींच्या आरक्षण विषयी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मध्यप्रदेश सरकारला (Madhya Pradesh Government) एक मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदिल दिला आहे. तसेच निवडणूक आयोगाला एका आठवड्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप आरक्षण (Maharashtra OBC Reservation) लागू झाले नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. (BJP on Thackeray Government)

 

”मध्य प्रदेश सरकारला जमलं ते ठाकरे सरकारला का जमलं नाही,” असा सवाल भाजपकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (BJP Leader Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, ”राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि ओबीसी विरोधी धोरणामुळे राज्यात ओबीसी आरक्षण गेलं आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर या सरकारला महाराष्ट्रातील जनता आणि ओबीसी समाज सोडणार नाही,” असा इशाराही बावनकुळे यांनी दिला. (BJP on Thackeray Government)

पुढे बावनकुळे म्हणाले, ”मध्य प्रदेश सरकारने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ट्रिपल टेस्ट सांगितल्या होत्या त्या पुर्ण केल्या.
ओबीसी आयोग नेमणे, एम्पिरिकल डेटा गोळा करणे, राजकीय मागासलेपण जाहीर करण्याच्या टेस्ट जाहीर करुन सादर केल्या.
याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारलाही सांगितलं होतं, या पद्धतीने जा आणि तुमचं आरक्षण घ्या.
सुप्रीम कोर्टाने कधीही आरक्षण थांबवलं नव्हतं. पण राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षण गेलं.
ट्रिपल टेस्ट करायचीच नाही, हेच धोरण राज्य सरकारने ठेवलं असल्याचा आरोप,” त्यांनी केला आहे.

 

Web Title :- BJP on Thackeray Government | bjp criticizes thackeray government over obc reservation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा