‘आपलं ठेवायचं झाकुन अन् दुसर्‍याच पहायचं वाकून’, भाजपच्या ‘त्या’ धोरणाबाबत ‘उलट-सुलट’ चर्चा

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या घराणेशाहीवर सातत्याने टीका करणारा भारतीय जनता पक्ष स्वतःच्या पक्षातील घराणेशाहीकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसून येतो. २०१९ चा विजय म्हणजे देशाने घराणेशाहीचा केलेला पराभव आहे. असे देखील भाजपकडून म्हटले गेले. देशातील काही राज्यांमध्ये भाजपमधील नेत्यांचीही घराणेशाही रुजली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश आणि हरीयाणा राज्यातील दोन राजकीय कुटुंबे घराणेशाहीत आघाडीवर आहेत. या दोन राजकीय कुटुंबातील प्रत्येकी तीन सदस्य सक्रिय राजकारणात असून त्यांच्याकडे सरकारमध्ये आणि कायदेमंडळातील महत्वाची पदे आहेत. घराणेशाहीवर सातत्याने टीका करणारा भारतीय जनता पक्ष या घराणेशाहीच्या राजकारणाकडे मात्र दुर्लक्ष करताना दिसून येतो.

हरियाणातील चौधरी कुटुंब

या आधीच्या नरेंद्र मोदी सरकारमध्ये चौधरी वीरेंद्र सिंह हे पोलाद मंत्री होते. त्यांनी स्वत:च पदाचा राजीनामा दिला होता. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते असून राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा मुलगा बिरजेंदर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) नोकरी सोडली. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बिरजेंदर सिंह यांनी नोकरी सोडली आणि त्यांना लोकसभेचे तिकीटही देण्यात आले. ते हरीयाणातील हिसार लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. भाजपाने वीरेंद्र सिंह यांच्या पत्नी प्रेमलता यांना जिंद विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली आणि त्या निवडूनही आल्या. आता त्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य कायदेमंडळात पदावर आहेत.

उत्तरप्रदेशातील कल्याणसिंह यांचे कुटुंब

भाजपामध्ये कल्याण सिंह राज्यस्थानचे राज्यपाल असून राज्यपालपदाचा आणखी एक कार्यकाळ मिळविण्यास ते इच्छुक आहेत. त्याचे पुत्र राजवीर सिंह एटा लोकसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत. २०१७ मध्ये औतली विधानसभा मतदार संघातून निवडून आलेले कल्याण सिंह यांचे नातू संदीप सिंह हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये मंत्री आहेत. अशा प्रकारे कल्याण सिंह यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे.

सिने जगत –

अभिनेत्री प्रियंका चोपडाचा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

‘शिळ्या कडीला ऊत’ ! शोएब अख्तरकडून अभिनेत्री सोनाली बेंद्रेबाबत धक्‍कादायक ‘गौप्यस्फोट’