RSS मध्ये मोठे फेरबदल, महासचिव पदावरून रामलाल यांना हटवून ‘या’ नेत्याची नियुक्‍ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाचे संघटन महासचिव रामलाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सह संपर्क प्रमुख बनवण्यात आले आहे. ही माहिती सूत्रांनी दिली आहे. २००६ साली रामलाल यांना भाजपमध्ये संघटन महासचिवाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांच्या जागी भाजपाचे सह संघटन मंत्री व्ही सतीश जबाबदारी सांभाळतील.

२००५ मध्ये भाजप संघटन महासचिव संजय जोशी यांचे सेक्स सीडी प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यांना भाजपच्या पदावरून मुक्त करण्यात आले होते. यानंतर २००६ पासून रामलाल यांनी भाजपच्या संघटन महासचिवाची जबाबदारी सांभाळली.

भाजप पक्षातील संघटन महामंत्री आणि प्रदेश संघटन मंत्री संघातून पाठवले जातात. या पदावरील लोक भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यात समन्वय ठेवण्याचे काम करतात. भारतीय जनता पक्षात भाजप अध्यक्षानंतर भाजप महासचिव हे महत्वपूर्ण पद मानले जाते.

आरोग्यविषयक वृत्त

‘ऐकावं ते नवलच’ ! तणावामुळे आयुष्य वाढणार ; घ्या जाणून

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

‘ही’ ५ सौंदर्यप्रसाधने ठरू शकतात त्वचेसाठी ‘घातक’ !

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच