सर्व्हेनुसार भाजपसाठी 40 मतदारसंघात असणार ‘काटे की टक्कर’, 2 मतदारसंघात भाजपच्या ‘पराभवाची’ शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा निवडणूकीची धामधूम सुरु असताना भाजपच्या अंतर्गत सर्व्हेने विरोधकांना सावध केले आहे. कारण या सर्व्हेत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सर्व्हेनुसार 164 जागांपैकी भाजप 122 जागांवर आपला विजय निश्चित करेल असे मानले जात आहे. मात्र 40 जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. तर 2 मतदार संघात भाजपचा पराभव दर्शवण्यात आला आहे.

या मतदारसंघात भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता –

भाजपला धक्का देणारे हे दोन मोठे मतदार संघ बारामती आणि मालेगाव असल्याचे समजते आहे. बारामतीत अजित पवारांच्या विजयाची दाट शक्यता आहे तर मालेगावमधून काँग्रेस विद्यमान आमदार आसीफ शेख यांची घौडदौड कायम राहण्याची शक्यता या सर्व्हेत व्यक्त करण्यात आली आहे.

पंकजा मुंडे, आशिष शेलार यांच्यासाठी अटीतटीची लढत –

भाजपच्या सर्व्हेनुसार भाजपला 40 जागांसाठी झुंज द्यावी लागणार आहे कारण या मतदारसंघात अटीतटीचा सामना रंगणार आहे. तर महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधात परळी मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी दंड थोपटले आहे. या मतदारसंघात काटे की टक्कर पाहायला मिळेल. तर शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी देखील वांद्रे पश्चिममधील लढत सोपी नसणार आहे या मतदारसंघातून काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांचे तगडे आव्हान असणार आहे.

कर्जत जामखेडमधून रोहित पवार यांंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने पवार कुटूंबाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीकडून या मतदारसंघात तगडी फिल्डिंग लावण्यात आली आहे. याच मतदारसंघातून भाजपने राम शिंदे यांना उमेदवारी दिली आहे, यामुळे सामान्यात चांगलीच रंगत चढणार आहे. याशिवाय साकोली मतदारसंघात काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून परिणय फुके यांना आव्हान देण्यात आले आहे. या मतदार संघात टफ फाइट असणार आहे. भाजपच्या सर्व्हेत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

याशिवाय कराड, पंढरपूर, कोल्हापूर दक्षिण, लातूर शहर, पुसद, चिखली (बुलढाणा) या मतदारसंघात देखील काटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी