सत्ता जाताच भाजपच्या अंतर्गत कुरघोड्या समोर येण्यास सुरूवात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील भाजपसमोर अडचणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. एकनाथ खडसेंनी आवाज उठवल्यावर माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी देखील सूर आवळला. राज्याती नेतृत्व ओबीसी समाज्याच्या नेत्यांनी डावलत असल्याची तक्रार भाजपच्या या नेत्यांची आहे, तसेच त्यांनी पंकजा मुंंडेंची देखील साथ असल्याचे सांगितले जात आहे.

बुधवारी पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या विधानसभेला कमी झालेल्या जागा आणि सर्वात मोठा पक्ष असूनही सत्तेबाहेर राहिलेच्या बाबीवर लक्ष वेधले.

प्रकाश शेंडगे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात गौप्यस्फोट केला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी दिल्लीतून आदेश आला होता. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर हा निरोप घेऊन आले होते. मात्र आम्ही विरोधी केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी सावध राहावे असा इशारा शेंडगे यांनी पंकजा मुंडेंना दिला. त्यामुळे आता असेच सुरु राहिले तर भाजपमध्ये येणाऱ्या काळात अनेक नेते बंड करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

भाजप वास्तवत: अत्यंत शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळखला जातो. महाविकासआघाडी सत्तेत येण्यापूर्वी प्रत्येक भाजप नेत्यात बोलण्यात सुसुत्रता होती परंतू आता नेते माध्यमांसमोर येण्याचे टाळत आहेत. नाराज नेत्यांनी आता बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता भाजपातील अंतर्गत कुरघोड्या चव्हाट्यावर येताना दिसत आहे.