केंद्रीय मंत्री जावडेकरांचे राहुल गांधींना जाहीर आव्हान; म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   देशातील शेतकरी नव्या कृषी कायद्यांवर समाधानी असून पंतप्रधान किसान योजनासारख्या योजनांवरही त्यांचा आक्षेप नसल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Union Minister Prakash Javadekar) यांनी सांगितले. तर कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणातात नवे कृषी कायदे रद्द करा. पण कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की नाही यावर चर्चेसाठी मी राहुुल गांधी आणि डिएमकेला जाहीर आव्हान देत असल्याचे जावडेकर यावेळी म्हणाले.

चेन्नई येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जावडेकर यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काही गंभीर आरोप केले आहेत. नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या काही शेतकऱ्यांची त्यांच्या राजकीय गुरुंकडून दिशाभूल केली जात आहे, तसेच जणू काही संपूर्ण देशातील शेतकरी त्यांच्यासोबत आहेत असे चित्र रंगवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान यावेळी जावडेकर यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. तसेच जावडेकर यांनी यावेळी पंजाबच्या शेतकऱ्यांना युपीएच्या तुलनेत एनडीएच्या कार्यकाळात दुप्पट मुलभूत आधार किंमत मिळाल्याचा दावा केला आहे.