Pravin Darekar | ‘आमची वायफळ बडबड, मग यांची मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीवरून राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु झाली असताना भाजप (BJP) नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. भाजपच्या प्रतिक्रियांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) विधानपरिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला होता. मिटकरी यांच्या टीकेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

फायद्याची गोष्ट ! दररोज फक्त 7 रूपयांची ‘गुंतवणुक’ अन् दरमहा होईल 5 हजारांची ‘बचत’, टॅक्समध्ये देखील मिळणार ‘सूट’, जाणून घ्या

काय म्हणाले अमोल मिटकरी ?
अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर (Pravin Darekar) महाराष्ट्र महाविकास आघाडी (Maharashtra Mahavikas Aghadi) सरकारवर बोलायला लागले. अर्थ स्पष्ट आहे. भाजप मानसिकदृष्ट्या थकलेला पक्ष झालाय. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसरं त्यांच्याकडे काहीच शिल्लक नाही, असं ट्विट करत मिटकरी यांनी खोचक टोमणा मारला होता. यावर आता प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे राजकीय कलगीतुरा रंगण्याची चिन्ह आहेत.

Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची पीएम मोदींसोबत सकारात्मक बैठक, नंतर मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे

थकणं भाजपच्या रक्तातच नाही – दरेकर
अमोल मिटकरी यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बोललो की वायफळ बडबड ? यांनी उधळलेली मुक्ताफळं कोणतं प्रबोधन करतात अमोल मिटकरी ? भाजपची ऊर्जा अक्षय आहे आणि ती कार्यकर्त्यांच्या कष्टातून मिळवलेली आहे. थकणं भाजपच्या रक्तातच नाही ! महाविकास आघाडीच्या प्रत्येक निर्णयातून मानसिक दिवाळखोरी दिसतेच आहे, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रांगताना दिसत आहे.

 

Also Read This : 

IBPS RRB PO/Clerk Notification 2021 | बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी ! 10466 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

 

Bribery | लाचखोरीच्या आरोपावरून पोलिस उपनिरीक्षकासह चौघे तडकाफडकी निलंबीत

 

Ahmednagar News | …म्हणून 70 वर्षांच्या आजींनी थोपटली भाजप खासदार डॉ. सुजय विखेंची पाठ

 

भाजपचे खासदार गिरीश बापट यांची ठाकरे सरकारकडे मागणी, म्हणाले – ‘राज्याच्या तिजोरीतून लस खरेदीसाठी तयारी दाखवलेले 7 हजार कोटी गरिबांना द्या’