Video : खूनाचा आरोपी हा भाजपाचा अध्यक्ष आहे : राहुल गांधी

जबलपूर : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या शिगेला पोहोचला आहे. प्रचार करताना राजकीय पक्षांमध्ये टीका-टिपण्णी तसेच आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली. खूनाचा आरोपी असलेला भाजपचा अध्यक्ष आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे झालेल्या सभेत त्यांनी हे विधान केले.

भाजप व अमित शहांवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की , ‘ खूनाचा आरोपी हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे, तर जय शहा जादूगार आहेत. तीन महिन्यात जय शहा यांनी ५० हजार रुपयांचे ८० कोटी केले आहेत.

गेल्या ५ वर्षात देशातील जनतेसोबत नरेंद्र मोदी यांनी अन्याय केला. अमित शहा युवकांना सांगतात पकोडे विका. त्यामुळे आत्ता आम्ही बेरोजगार युवकांसोबत आम्ही न्याय करणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर एका वर्षात २२ लाख सरकारी पदं भरली जातील. त्याचबरोबर स्थानिक संस्थांमध्ये १० लाख युवकांना नोकरी देणार असल्याचं आश्वासन राहुल गांधी यांनी यावेळी दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like