नाही तर एक एकाला उचलून आपटू ; अमित शहा यांचा शिवसेनेला गर्भित इशारा 

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात शिवसेना भाजपच्या विरोधात आग ओखत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी या आगीत तेल ओतले आहे. राज्यात युती झाली तर ठीक अन्यथा एक एकाला उचलून आपटू असा गर्भित इशारा अमित शहा यांनी शिवसेनेला दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा लातूर दौऱ्यावर आले असता त्यांनी हे विधान केले आहे. प्रत्येक बूथ प्रमुखांनी निवडणूक कशी जिंकता येईल हे पहिले पाहिजे. निवडणुका जिंकण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे असे अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.

लातूर येथे कार्यकर्त्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात अमित शहा यांनी शिवसेनेवरील हे सूचक वक्तव्य केले आहे. २४ डिसेंबर रोजी पंढपूर येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या नेत्यांवर कडाडून टीका केली. त्यांच्या टीकेला उत्तर देत बसण्यापेक्षा भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु केली आहे. शिवसेना आणि भाजप त्यांचे एकत्र सत्तेत राहून विळ्या भोपळ्याचे वैर निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या नेत्यांना येत्या काळात युती साठी बोलायला जाण्या अगोदर  स्वतंत्र लढलो तर आमची तयारी झाली आहे असे दाखवण्याचा हा एक संदेश होता असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

तर याच मेळाव्यास संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि ,शिवसेने सोबत युती करायची कि नाही याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील. महाराष्ट्रात युती होणार कि नाही होणार याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील परंतु आपणाला राज्यात ४० जागा निवडून आणायच्या आहेत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अमित शहा यांच्या भाषणाचे ठळक मुद्दे

– युती होईल का नाही याची चिंता तुम्ही करू नका. युतीची बोलणी आम्ही करू परंतु युती झाली नाही तर आपल्या मित्र पक्षांना पण          आपण पाडू.
-तिसरी पानिपतची लढाई जशी महत्वाची होती तशीच २०१९ ची लढाई आहे. पानिपतची लढाई आपण हरलो पण आपणाला २०१९ ची लढाई जिंकायची आहे असे अमित शहा म्हणाले आहेत.
– राहुल गांधी यांनी आपल्या घराण्याचा इतिहास बघून इतरांवर भष्टाचाराचे आरोप करावे
– राफेल प्रकरणी चौकशीची आवश्यकता नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हणले आहे
– भाजपने राज्यात आणि केंद्रात लोकांच्या एका पैशाचा हि भष्टाचार केला नाही.गरीब कुटुंबातून आलेल्या नेत्याला काँग्रेस बदनाम करण्याचे षडयंत्र करत आहे.
– जलयुक्त शिवार योजना हि देवेंद्र फडणवीस सरकारचे मोठे यश आहे.
– विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असे निकाल २०१९ च्या निवडणुकीचे लागले पाहिजे