BJP ने सुरू केली महाराष्ट्रासह ‘या’ 4 राज्यांच्या विधानसभेची तयारी, प्रभारी नेत्यांच्या नियुक्त्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु केली असून दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजपने या राज्यातील प्रभारींची घोषणा केली असून त्यांच्याबरोबर मदतीला सहप्रभारी देखील देण्यात आले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये चारही राज्यांच्या प्रभारींची घोषणा केली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी अमित शहांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावड़ेकर यांना निवडणूक प्रभारी तर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी व केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केले आहे.

 

खालीलप्रमाणे नियुक्त्या केल्या

१) दिल्ली
प्रकाश जावड़ेकर – निवडणूक प्रभारी
हरदीप सिंह पुरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय – निवडणूक सहप्रभारी

२) महाराष्ट्र
राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव – निवडणूक प्रभारी
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कर्नाटकचे माजी आमदार लक्ष्मण सावदी – निवडणूक सहप्रभारी

३) हरियाणा
केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर – निवडणूक प्रभारी
उत्तर प्रदेशचे मंत्री भूपेंद्र सिंह – निवडणूक सहप्रभारी

४) झारखंड
राष्ट्रीय महासचिव ओमप्रकाश माथुर – निवडणूक प्रभारी
बिहारचे मंत्री नंदकिशोर यादव – निवडणूक सहप्रभारी

दरम्यान, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये या वर्षाच्या अखेर तर दिल्लीमध्ये पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त