BJP Protest | भाजपचे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन; ‘विठ्ठल मंदिरात घुसणाऱ्या BJP कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात धुमश्‍चक्री

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – BJP Protest | भारतीय जनता पक्षाकडून आज (सोमवारी) संपूर्ण राज्यात मंदिर सुरू करण्यासाठी शंखनाद आंदोलन (BJP Protest) करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर (Vitthal-Rukmini Temple) उघडण्यासाठी देखील भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलन करताना कार्यकर्त्यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यान, आंदोलनकर्ते आणि पोलीस (Protesters and police) यांच्यात धुमश्‍चक्री झाल्याचं पाहायला मिळालं.

प्रार्थना स्थळे चालू करण्याची मागणी करत आज (सोमवारी) भाजपने राज्यभर आंदोनल सुरु केलं आहे. त्यावेळी पंढरपुरातील भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Srikant Deshmukh) आणि भाजप आमदार समाधान आवताडे (BJP MLA Samadhan Autade) यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी संत नामदेव पायरीजवळ आंदोलन केले. यावेळी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टाळला.

दरम्यान, यावेळी आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्यानी महाविकास आघाडीच्या (Mahavikas
Aghadi) विरोधात आंदोलन केलं आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित
होते. यावेळी विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान,
भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी हातात भाजपचे झेंडे घेऊन थेट नामदेव पायरीपासून विठ्ठल मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांना अटकाव केला. दरम्यान, पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात झटापट सुद्धा झालीय. यांनतर भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे देखील वाचा

Pune Police | पुण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; महिन्याभरापुर्वी झालं होतं पत्नीचं निधन

Pune News | पुण्यात बांगलादेशींची घुसखोरी ! मिलिटरी इंटेलिजन्सने दिली पुणे पोलिसांना माहिती, चौकशी सुरु

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  BJP Protest | BJP’s statewide Shankhanad movement; A scuffle broke out between BJP workers and police entering the Vitthal temple

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update