लोकसभा २०१९ : भाजपाकडून ‘या’ दोन दिग्गजांच्या जागेत बदल ; ३९ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूकीसाठीची आणखी एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. या यादीमध्ये काही उमेदवार बदलल्याचं दिसत आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना तिकीट देण्यात आले आहे.

तर दुसरीकडे मेनका गांधी आणि वरूण गांधी यांची सीट बदलण्यात आली आहे. वरुण गांधी यांना सु्ल्तानपूरऐवजी पीलभीत आणि मेनका गांधी या सुल्तानपूरमधून निवडणूक लढवतील.

आज भाजपामध्ये प्रवेश केलेल्या जयाप्रदा यांना रामपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. युपी सरकारमधील कॅबिनेट मंत्री रीता बहुगुणा जोशी यांना इलाहाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा पुन्हा एकदा गाजीपूर येथून मैदानात उतरले आहेत.