… म्हणून मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला, अरविंद सावंतांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढतच चालला आहे. शिवसेना जोपर्यंत एनडीएतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेबाबत विचार करू शकत नाही अशी भूमिका आघाडीने घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे शिवसेना एनडीए मधून बाहेर पडणार असल्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे.

30 मे रोजी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे तसेच नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने केंदीय मंत्रिपदाची शपत घेतली होती. मात्र त्यानंतर राज्यात झालेल्या विधानसभेच्या निकालानंतर भाजपने दिलेला 50 – 50 चा शब्द न पाळल्याने राजीनामा दिला असल्याचे अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. भाजपकडून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधानांकडे पाठविला असल्याचे देखील अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी जास्त संख्याबळ असलेल्या भाजपने विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी भाजपने शिवसेनेने आपल्याला साथ न दिल्याने हा निर्णय घेत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटात सत्ता स्थापनेच्या हालचालींना मोठा वेग आला होता.

राज्यात जनतेने कोणत्याच पक्षाला बहुमत न दिल्याने कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही अशात शिवसेनेने भाजपला युतीसाठी साथ न दिल्याने भाजपने विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केला होता अशात आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like