भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख मदन लाल सैनी यांचे दुःखद निधन झाले आहे. ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या निधनामुळे राज्यसभेचे उद्या होणारे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मदनलाल यांची प्रकृती खराब होती. त्यांना दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेदेखील त्यांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचल्या होत्या.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे. गहलोत यांनी लिहिले की, राजस्थानचे भाजप अध्यक्ष मदनलाल यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप वाईट वाटले. मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.

मदनलाल यांची गेल्याच वर्षी राजस्थानच्या भाजप अध्यक्ष पदी निवड झाली होती. त्या वेळी राजस्थानच्या भाजप अध्यक्ष पदासाठी चांगलाच वाद उदभवला होता. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे राजस्थान भाजपच्या अध्यक्ष होऊ इच्छित होत्या.

कोण आहेत मदनलाल सैनी
मदनलाल सैनी राजस्थानमधील झुंझुनूंच्या गुढ़ा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. सैनी जनसंघापासून राजकारणात सक्रिय राहिले आहेत. या आधी भाजपचे प्रदेश महामंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भाजपच्या अनुशासन समितीचे काम देखील त्यांनी पहिले आहे. त्यांच्या निधनामुळे राजस्थानच्या भाजप अध्यक्षपदी वसुंधरा राजे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.