‘या’ भाजप खासदाराचा ‘गौप्यस्फोट’ ! राज्याच्या 4 राजधान्या करण्याची मुख्यमंत्र्यांची तीव्र ‘इच्छा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्रप्रदेशची राजधानी असलेल्या अमरावतीला स्थानांतरीत करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी वाईएसआर कांग्रेस (YSR Congress) आणि तेलगु देशम पार्टी (TDP) यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. दोन्ही पार्ट्यांमध्ये सुरु असलेल्या शाब्दिक चकमकीमध्ये आता भाजपच्या खासदारांनी उडी घेतली आहे.

भाजपचे राज्यसभेतील खासदार टीजी वेंकटेश म्हणाले की, वाईएसआर प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे राज्याची राजधानी स्थानांतरित करण्याची मागणी केली आहे.

वेंकटेश हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, रेड्डी यांना आंध्रप्रदेशच्या चार राजधान्या करायच्या आहेत. सर्व ठिकाणचा विकास व्हावा. यासाठी रेड्डी हे विजयनगरम, काकीनाड़ा, गुंटूर आणि कडप्पा या ठिकाणी राजधानी करण्याच्या विचारात आहेत.

रेड्डी हे जेव्हा सत्तेबाहेर होते त्यावेळी त्यांनी TDP कडून आंध्रप्रदेशची अमरावती राजधानी होण्याला विरोध केला होता. या गोष्टीची आठवण करून देत वेंकटेश म्हणाले. त्यावेळी येथील जनतेनेसुद्धा याचा विरोध केला होता. वेंकटेश म्हणाले की, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या मुलाला याच कारणामुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच दिल्लीतील काही नेत्यांनी आपल्याला ही बातमी दिली असल्याचे वेंकटेश यांनी सांगितले. मात्र त्या नेत्यांची नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

आरोग्यविषयक वृत्त –

गांज्याच्या बीया’ आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी, दूर होतात ‘हे’ ९ आजार

बटाटे, पालकसह ‘या’ ७ पदार्थांना पुन्हा गरम करू नका, होऊ शकतात ‘हे’ आजार

द्राक्ष खा आणि कँसरची भिती सोडून द्या, आहारात समाविष्‍ट करा ‘हे’ १० पदार्थ

शरीराला आतून सशक्त बनवतो आवळा, ‘हे’ आहेत खास १० फायदे

गरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक!

गॅस आणि ‘या’ ९ समस्या दूर करणारा नंबर वन आहे ‘हा’ ज्यूस, एकदा नक्की घ्या

कोणत्‍या आजारांपासून वाचण्‍यासाठी कोणती फळे खावीत, जाणून घ्‍या