‘त्या’ भाजप खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थांसह अटक

लखनऊ : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणूकांचे वारे वाहत आहे. त्यामुळे सर्व उमेदवार आपली प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेत आहेत. त्यात आता मध्य प्रदेशमधील भाजपा खासदाराच्या मुलाला अंमली पदार्थासह अटक केली आहे. संपतिया उइके असे या भाजप खासदारांचे नाव आहे. तर सत्येंद्र हे त्यांच्या मुलाचे नाव आहे.

मंडला येथील पॉलिटेक्निक चौकाजवळ वाहनांची तपासणी केली जात होती. तेव्हा सत्येंद्र हा आपल्या दोन मित्रांसह कारमधून जात होता. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांची कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने गाडी थांबवली नाही, याउलट त्याने आपली कार भरधाव नेली. त्यावरून पोलीसांना शंका आली. त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना पकडले.

तेव्हा पोलिसांसमोर तिनही तरूण घाबरलेले होते. त्यामुळे पोलिसांनी कारची तपासणी केली. त्यानंतर पोलीसांना कारमध्ये अंमली पदार्थ सापडले, त्यामुळे तिन्ही युवकांना पोलीसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान, खासदाराच्या मुलासह त्याच्या मित्रांना अंमली पदार्थासह अटक केली आहे. त्यांना आज (गुरूवार) न्यायालयात हजर केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या नाकाबंदीत हा प्रकार उघड झाला आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक परिहार यांनी दिली.

संपतिया उइके हे भाजपाचे नेते असून २०१७ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले आहेत. सत्येंद्रवर यापूर्वीही अनेकवेळा आरोप झाले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

ह्याहि बातम्या वाचा –

रोहित शेट्टीचा संघर्षमय प्रवास

डॉ. सुजय विखे जाणार खा. गांधी, माजी आ. राठोड यांच्या भोटीला

बाळासाहेब थोरात काही हायकमांड नाहीत : विखे-पाटील

नाना पटोलेंना माझा आशिर्वाद : नितीन गडकरी

बाळासाहेब थोरातांना स्पष्टीकरण द्यायला मी बांधिल नाही , ते काही हायकमांड नाहीत

Loading...
You might also like