भारतीयाशी विवाह केल्यानं सोनियांना ‘नागरिकत्व’ मिळालं, विचारला नव्हता धर्म, भाजपाच्या राम माधवांनी सांगितलं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – नागरिकत्व संशोधन कायद्यावर सुरु झालेल्या वादावर भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी भाष्य केले. राम माधव यावर म्हणाले की आम्ही धर्माच्या आधारे भेदभाव करत नाही. त्यांनी सांगितले की काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना भारतीयाबरोबर लग्न करुन येथे नागरिकत्व मिळाले आहे. त्यांना कोणी त्यांचा धर्म विचारला. हा कायदा इतका साफ आहे परंतु त्यावरुन वाद निर्माण केला जात आहे. अनेक लोकांचा यात मृत्यू झाला आहे. सरकारने आपले या कायद्यामागील उद्देश काय आहेत, हे सांगितले आहेत.

राम माधव म्हणाले की भारतात 4 प्रकारे नागरिकत्व मिळते. जन्म, नैसर्गिकदृष्ट्या, जे शरण घेऊ इच्छितात आणि आता नागरिकत्व संशोधन कायद्याद्वारे. ते म्हणाले की यात तीन शेजारील देशातील नागरिकांना नागरिकत्व मिळेल. हा कायदा नागरिकत्व काढून घेणारा नाही. कोणताही मुस्लिम भारताचे नागरिकत्व घेऊ शकतो, परंतु यासाठी मानदंड पूर्ण करावे लागतील.

राम माधव म्हणाले की 1972 मघ्ये युगांडाच्या हुकूमशाहाचे राज्य होते. त्यांनी सर्व बाहेरच्या लोकांना बाहेर काढून टाकले. त्यातील अनेक गुजराती होते. काही लोक लंडनला गेले तर काही भारतात आले. इंदिरा गांधींनी त्यावेळी त्यांना मदत केली, कोणीही काहीही बोलले नाही. भारतात इस्लाम धर्माचे 72 समुदाय राहतात. पाकिस्तान जेव्हा इस्लामिक रिपब्लिक बनवला तेव्हा अल्पसंख्यांकांवर अत्याचार सुरु झाले.

एनआरसी – सीएए वेगवेगळे कायदे –
राम माधवने सांगितले की मुजीबुर्रहमान एक धर्म निरपेक्ष देश करु इच्छित होते परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर बांग्लादेश इस्लामिक देश बनला. नागरिकत्व कायदा कलम 14 चे उल्लंघन नाही. बांग्लादेशाच्या सध्याच्या अल्पसंख्यांकांसाठी हे योग्य नाही. एनआरसी पूर्णता सीएएपासून वेगळे आहे. पहिला एनआरसी पहिल्या जनगणनेतून समोर आला. एनपीआरची सुरुवात यूपीए सरकारने 2010 मध्ये केली होती.

जेथे नागरिकत्व कायद्यासंबंधित देशभरातील आंदोलने समोर आली, तेथे भाजपकडून नागरिकत्व कायद्याच्या मोहिमेसाठी प्रयत्न केले. पंतप्रधान मोदींनी नागरिकत्व संशोधन कायद्याच्या समर्थनात ट्विटरवर मोहिम सुरु केले.

भाजपने सुरु केले #IndiaSupportsCAA मोहिम –
#IndiaSupportsCAA हॅशटॅगने पीएम मोदींनी मोहिमेला सुरुवात केली. आणि लिहिले की भारत सीएएचे समर्थन करते, कारण सीएए त्रस्त शरणार्थिंना नागरिकत्व देण्यासंबंधित आहे. येथे कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याबाबत नाही. नमो अ‍ॅपवर सीएए संंबंधित कागदपत्र आहेत, व्हिडिओ आणि कंटेट देखील देण्यात आला आहे. तुम्ही या संदर्भात अभियान चालवा.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/