भाजपची उमेदवारांची तिसरी यादी जाहीर ; महाराष्ट्रातील सस्पेन्स कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पक्षाने आपली तिसरी यादी जाहीर केली असून ४८ उमेदवारांची हि यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या दोन याद्यांमध्ये मध्य प्रदेशाच्या एकही उमेदवारांचे नाव जाहीर नकरणाऱ्या भाजपने तिसऱ्या यादीत मध्य प्रदेशाच्या उमेदवारांची नवे जाहीर केली आहेत. गोवा, मध्य प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा हे हजारीबाग मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे उत्तर गोवा मधून लढत आहेत. नरेंद्र सिंह तोमर हे मुरैना मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.

आज पर्यंत भाजपने आपल्या २८६ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच गुजरात विधान सभेच्या तीन आणि गोवा विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीचे देखील उमेदवार भाजपने या यादीसहित जाहीर केले आहेत. तिसरी यादी जाहीर झाली तरी महाराष्ट्रातील काही जागांचा सस्पेन्स भाजपने अद्याप कायम ठेवला आहे.