देशात डिसेंबरपर्यंत सर्वांना दिली जाईल कोरोना लस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, डिसेंबर महिन्यापर्यंत देशात कोरोना व्हॅक्सीनेशनचे(Corona vaccination) काम पूर्ण केले जाईल. व्हॅक्सीनबाबत मागच्या आठवड्यात आरोग्य विभागाने सविस्तर माहिती दिली होती. विभागाकडून सांगण्यात आले होते की, डिसेंबरपर्यंत 216 कोटी व्हॅक्सीन डोस उपलब्ध असतील. म्हणजे 108 कोटी लोकांचा कोरोना व्हॅक्सीनेशनचा(Corona vaccination) पूर्ण आराखडा सादर केला होता. विभागाने व्हॅक्सीनची नावे सुद्धा सांगितली होती. कोविशील्ड, कोव्हॅक्सीन, नोवाव्हॅक्सीन, जेनोव्हा आणि स्पूतनिक-व्ही चा उल्लेख केला होता.

पुण्यातील Lockdown बाबत मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून घोषणा

केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्ट केले की, देशात व्हॅक्सीनेशनचा कार्यक्रम डिसेंबरच्या अगोदरपर्यंत पूर्ण केला जाईल. यापूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले – मी आणि इतर अनेक लोकांनी केंद्र सरकारला कोरोनाच्या लाटेबाबत वॉर्निंग दिली. अनेकदा आम्ही सरकारला सल्ला सुद्धा दिला, परंतु सरकारने आमची थट्टा केली.

खुशखबर ! शेतकर्‍यांना मिळणार 4000 रुपये; 30 जूनच्या पूर्वी येथे करावा लागेल अर्ज, जाणून घ्या पूर्ण डिटेल

सरकारला समजत नाही कुणाशी सामना करत आहोत

राहुल गांधी यांनी म्हटले, सरकारला समजत नाही की, ते कुणाशी सामना करत आहेत. या कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनचा धोका समजून घेतला पाहिजे. तुम्ही संपूर्ण ग्रहाला धोक्यात टाकत आहात, कारण तुम्ही 97% लोकसंख्येवर व्हायरसचा हल्ला होऊ देताय आणि केवळ 3% लोकांनाच लस दिली गेली आहे.

BMC Election 2021 : निवडणूक पुढे ढकलली जाणार ? केंद्रीय निवडणूक आयोगाची अधिकाऱ्यांसोबत बैठक, लवकरच होणार निर्णय

व्हॅक्सीन सर्वात मोठे शस्त्र

केरळच्या वायनाडचे खासदार सांसद राहुल गांधी यांनी म्हटले की, ज्या लोकांकडे अन्न नाही, जे कमजोर आहेत त्यांना कोरोना होऊ शकतो. ज्यांना कोणता रोग आहे कोरोना त्यांच्यावर हल्ला करतो. कोरोनाला रोखण्याचे सर्वात मोठे शस्त्र व्हक्सीन आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन…हे सर्व अस्थायी उपाय आहेत.

 

Immunity Booster Kadha : संसर्गापासून मुक्त होण्यास ‘या’ औषधी वनस्पतींचा काढा मोठी मदत करेल; इतर देखील अनेक फायदे, जाणून घ्या

रक्ताची कमतरता असल्यास आहारात ‘या’ 12 सुपर फूड्सचा समावेश करा, जाणून घ्या

तुळशीसह ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, फुफ्फुसे एकदम मजबुत अन् निरोगी बनतील, जाणून घ्या