व्यंगचित्राचा निषेध म्हणून भाजपने राज ठाकरेंनाच चढवलं फासावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्रते न बघवते या व्यंगचित्रामर्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर भाजप समर्थकाने राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ‘अच्छे दिन न बघवीते’ या शिर्षकाचे व्यंगचित्र या भाजप समर्थकाने काढले आहे.

‘अच्छे दिन न बघवीते’ या व्यंगचित्रात राज ठाकरेंनाच फासावर लटकवले आहे. त्या फासाचा दोर हा मोदींच्या हातात दाखवला आहे. राज ठाकरेंना अच्छे दिन बघवत नाहीत. नोटबंदीमुळे राज ठाकरेंचा मोदींवर राग आहे. राज यांच्या फासाचा दोर मोदींच्या हातात दिला आहे. तर मोदींचे हात बळकट करा, असं अमित शहा म्हणत आहेत, असं हे व्यंगचित्र आहे.

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रात पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर जहरी टीका केली. मोदी यांनी ‘प्रजासत्ताक’ फासावर लटकवल्याची बोचरी टीका व्यंगचित्रातून केली होती. राज ठाकरेंनी काढलेले हे व्यंगचित्र काही काळात प्रचंड व्हायरलं झाले होते. भाजप समर्थकांनी या व्यंगचित्रावर आक्षेप घेतला. तसंच हा भारतमातेचा अपमान असल्याचंही सांगितलं आहे.

You might also like