आर्थिक मंदीच्या फटक्यामुळं 670 कोटींची संपत्‍ती झाली ‘एवढी’, मंगलप्रभात लोढा नव्हे तर ‘हे’ भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांच्या यंदाच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या उत्पन्नात घट झाल्याचे दिसून आले आहे. पराग शहा हे श्रीमंत उमेदवाराच्या यादीत मोडतात. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शहांकडे सुमारे 670 कोटी रुपयांची संपत्ती होती.

केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून शेअर बाजारात प्रचंड घसरण झाली आहे. तसेच, गृहनिर्माण उद्योगालाही मोठा फटका बसला आहे. तरीही मंदी नसल्याचा दावा भाजप सरकारकडून केला जात आहे. पराग शहा यांना मंदीचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. दोन वर्षांत त्यांच्या संपत्तीत सुमारे 150 कोटी रुपयांची घट होऊन सध्या त्यांची संपत्ती पहिल्यापेक्षा अधिक कमी झालेली आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणुकीचा त्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

2017 मध्ये पराग शहा हे मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत राजकारणी ठरले होते. शहा यांचे शिक्षण बी.कॉम. पर्यंत झाले असून व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अशा दोन मार्गांनी त्यांनी उत्पन्नाचे मार्ग दाखवले आहेत. पराग शहा यांची 501 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. ती यंदा 350 कोटींवर आली आहे.

मुंबईत सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा होते. लोढाही बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी 441 कोटी संपत्ती जाहीर केली होती. मात्र, पराग शहा यांनी सुमारे 500 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली असल्याने शहा हे भाजपचे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

visit : Policenama.com