‘बीजेपी , आरएसएस आणि सीपीएम हे सर्वच कमकुवत असल्याने हिंसेचा वापर करतात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे सर्वच हिंसेचा वापर करतात असे म्हणत काँग्रेसने सर्वांवरच सडकून टीका केली आहे . इतकेच नाही तर काँग्रेसने स्वत:वरच स्तुतीसुमने उधळत काँग्रेसने कायमच हिंसेसोबत लढताना अहिंसेचा वापर केला आहे . असेही म्हटले आहे.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून  राहुल गांधी यांचा माईकवर बोलतानाचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. यासोबतच त्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी यांच्यावर निशाणा साधत टीका करण्यात आली आहे.

दरम्यान आपल्या ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटले की , ” भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी हे नेहमीच हिंसेचा वापर करत असतात . हिंसा हे कमकुवत लोकांचे शस्त्र आहे . काँग्रेसने नेहमीच या हिंसेच्या विरोधात लढा दिला आहे . परंतु काँग्रेसने त्यांच्या या हिंसेविरुद्ध लढताना नेहमीच अहिंसेचा वापर केला आहे.” असे म्हणत काँग्रेसने मात्र स्वत:चीच पाठ थोपटून घेतली आहे.

निवडणुका जवळ आल्या की, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसू लागतात . नुकत्याच लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहे . यानंतर आचारसंहिताही लागू झाली आहे. राजकीय पक्ष आपापल्या तयारीलाही लागले आहेत . यासोबतच आरोप-प्रत्यारोप होतना दिसत आहेत. सध्या आचारसंहिता लागू झाली आहे . अशातच आता आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी अनेक तक्रारींचा भडीमार सध्या निवडणूक आयोगाला सहन करावा लागत आहे. आचारसंहिता लागू असतानाही अनेक पॅट्रोलपंप, एअरपोर्ट याठिकाणी नरेंद्र मोदी यांचे पोस्टर्स आहेत . असे म्हणत मोदींवर आचारसंहिता भंग केल्याची तक्रारही काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.