‘माकप’चे के.पी. रवींद्रन यांच्या हत्याप्रकरणी भाजप आणि RSSच्या ९ कार्यकर्त्यांना जन्मठेप

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माकपचे कार्यकर्ते के.पी. रवींद्रन यांच्या हत्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ९ कार्यकर्ते दोषी आढळले आहेत. या ९ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

केरळमधील कन्नूर तुरुंगात असताना ६ एप्रिल २००४ रोजी के. पी. रवींद्रन यांचा मृत्यू झाला होता. कन्नूर तुरुंगात कैद असलेल्या भाजप आणि संघाच्या कैद्यांनी रवींद्रन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.

रवींद्रन यांच्या मृत्यूप्रकरणी एकूण ३१ जणांवर आरोप करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यातील १५ जणांना अतिरिक्त ठरवले. त्यानंतर न्यायालयाने ९ जणांचा हत्येत सहभाग असल्याचं सांगत त्यांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. पवित्रन, फाल्गुनन, के. पी. रेघू, सनल प्रसाद, पी. के. दिनेश, के. ससी, अनिल कुमार, सुनी आणि अशोकन यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाच्या दीर्घ कारवाईनंतर दिलेल्या या निर्णयावर माकपच्या कार्यकर्त्यांकडून न्याय मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यात राजकारणातील कुरघोडींनी हिंसाचाराचे वळण घेतले आहे. अनेक वर्षांपासून या भागात संघ आणि डावे पक्ष यांच्यातील वादाने हिंसाचाराचे रूप धारण केले आहे. तर प. बंगालमध्येही अनेक वर्षांपासून तृणमूल आणि भाजपमध्ये हिंसाचार सुरु आहे. या हिंसाचाराने अनेकांचे जीव घेतले आहेत. मात्र या हिंसाचारावर पूर्णविराम केव्हा लागेल हे पाहणेच योग्य राहिल.

सिनेजगत बातम्या

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !