अर्णब गोस्वामी अटकेच्या निषेधार्थ भाजपचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्यावतीने टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले.

भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात उपमहापौर सरस्वती शेंडगे, हेमंत रासने, धीरज घाटे, गणेश घोष, दत्ता खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, दीपक नागपुरे, संदीप लोणकर आदी सहभागी झाले होते.

पालघर येथील साधूंची हत्त्या, अभिनेता सुशांतसिंग मृत्यू प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी ठामपणे प्रश्न विचारून महाविकास आघाडी सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणले. याकरिता राज्य सरकारने सूडबुद्धीने त्यांना अटक केली, असा आरोप मुळीक यांनी आंदोलकांसमोर बोलताना केला. राज्यात आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची टीका वक्त्यांनी केली.