…तर शाहू महाराजांच्या नावाने चालवणारी ‘सारथी’ बंद करुन टाका, खा. संभाजीराजे संतापले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यात शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) नावानं चालवणारी संस्था ‘सारथी’ (Sarathi) नीट चालू द्यायची नसेल तर बंद करुन टाका, असे संतप्त विधान भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती (BJP Sambhaji Raje) यांनी केलं आहे. वर्ष होऊन गेलं तरी सारथीची अवस्था जोशी होती तशीच आहे. सरकारमध्ये नेमकं काय सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

खासदार संभाजी राजे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ते म्हणाले, पुण्यातील ‘सारथी’ ही संस्था शाहू महाराजांचं जीवनस्मारक आहे. मराठा समाजाच्या विकासासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, वर्ष होऊन गेलं तरी सारथीची अवस्था जशी होती तशीच आहे. सरकार काय करतंय हे कळायला मार्ग नाही. शाहू महाराजांच्या नावानं चालणारी संस्था नीट चालू द्ययची नसेल तर बंद करुन टाका, असंही त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही याची हमी सरकार घेणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

खासदार संभाजीराजे पुढे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर आता 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काहीतरी गडबड होऊ शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला. सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखे दिसत आहे. म्हणूनच हा ईडब्ल्यूएसचा मुद्दा रेटला जात आहे का ? असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. तसेच 25 जानेवारीच्या सुनावणीत गडबड झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.