आता भाजपच म्हणत आहे राहुल गांधींना PM 

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे नवीन पंतप्रधान कोण असतील, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. त्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीवर भाजप टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच भाजपच्याच ट्वीटर अकाऊंटवरून राहुल गांधीनांच पंतप्रधान म्हटलं आहे.

भाजपचे हे ट्वीट म्हणजे, केंद्रीय अर्थसंकल्पावर काँग्रेसने एक ग्राफिक ट्विट करत ६ हजारांची घोषणा कशी फसवी आहे, हे सांगितले होते. त्यावर प्रतिक्रिया आहे. आंध्रप्रदेश भाजपने ट्विट करून काँग्रेसच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला. या अर्थसंकल्पात अल्प भूधारक शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजाराचे अनुदान देण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने जाहीर केला. मात्र ही तरतूद फसवी आहे. सरकारने प्रतिदिवस १७ रुपये देऊन शेतकऱ्याची खिल्ली उडवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

त्यावर काँग्रेसच्या याच ट्विटला उत्तर देत आंध्रप्रदेश भाजपाने हे ग्राफिक राहुल गांधींनी तयार केलं असं असावा. कारण वर्षाला ६ हजार म्हणजे महिन्याला ५०० रुपये होणारच यात वेगळं काय आहे ? पप्पू पार्टीचा म्हणजेच काँग्रेसचा बुद्ध्यांक शून्य असून एक दिवस राहुल गांधी PM नक्की होतील, असं ट्विट आंध्रप्रदेश भाजपाने केलं आहे. तसेच थांबा राहुल गांधी PM आहेतचकी… PM म्हणजे Poor in Maths, असं ट्वीट भाजपने केले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी केलेल्या या ट्वीटवर भाजपने उत्तर दिलं आहे. त्यावर राहुल गांधी काय आणि कसं उत्तर देतील हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

You might also like