home page top 1

भाजपमधील जागा ‘हाऊसफुल्‍ल’, दुसर्‍यांदा ‘मेगा’ भरती नाही ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘स्पष्टीकरण’

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. या इन्कमिंगला बंद करण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. भाजपमध्ये जागा फुल्ल झाल्यात, आता भरती नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केलं आहे. आज अमरावतीतून भाजपच्या ‘महाजनादेश’ यात्रेला सुरवात झाली आहे.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात शिवसेना – भाजप युतीने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. युती सरकारने शेतकऱ्यांपासून तर बेरोजगारांपर्यंत प्रश सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. यासोबतच गरिबांना सुद्धा न्याय दिला आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत केलेल्या प्रत्येक कामाची माहिती देऊन करून दाखविल्याचे उदाहरणे देऊन स्पष्ट केले. महाजानदेश यात्रेला राज्यातील मंत्रिमंडळातील भाजपचे मंत्री, खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं सांगत या जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने गेल्या १५ वर्षात काय काम केलं? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी केलं.

दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या

आम्ही गेल्या पाच वर्षात राज्यात ३० हजार किलोमीटर रस्त्याचं जाळं विणलं. हा देशातील विक्रम आहे. दीड लाख शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचं कामही आमच्याच सरकारनं केलं. आता मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाचं कामही सुरू आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक योजना आम्ही प्रामाणिकपणे राबवली आहे. त्यामुळे आम्हाला दुष्काळ संपवण्यासाठी महाजनादेश द्या, असं आवाहन फडणवीस यांनी केलं.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like