BJP | मोदींवरील टीकेनंतर भाजपाचा TRS ला इशारा; म्हणाले – ‘तुमच्या पक्षातील पुढील ‘एकनाथ शिंदे’ ठरु शकतो’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BJP | नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नेतृत्वाखालील सरकार जाऊन बिगरभाजपा सरकार सत्तेत यायला हवे. इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी उघडपणे आणीबाणीची घोषणा केली. मात्र आज भारतामध्ये अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekhar Rao) यांनी केली होती. यावरून आता भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. तेलंगणा भाजपाने (BJP) ही टीका करताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) संत्तासंघर्षाचा संदर्भ दिला आहे.

 

राव यांच्या पक्षामधील अनेक नेते नेतृत्वावर नाराज असल्याचे सूचित करत तेलंगणा भाजपाचे अध्यक्ष बंदी संजय यांनी हैद्राबादमध्ये पत्रकार परिषदेत म्हटले की, तुम्ही एकनाथ शिंदेंबद्दल बोलता, त्याआधी तुम्ही स्वत:च्या पक्षाकडे लक्ष द्या. टीआरएसमध्ये अनेक एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळेच केसीआर यांनी अनेकदा एकनाथ शिंदेंचा उल्लेख केला असावा. त्यांच्याच पक्षात एकनाथ शिंदेंसारख्या नेत्यांचा प्रभाव वाढत असल्याने त्यांना भीती वाटत असावी.

 

संजय यांनी म्हटले की, पूरादरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री लोकांच्या भेटी घेत होते. तर केसीआर फार्महाऊसमधून बाहेर पडले नाहीत. त्यांच्या पक्षामध्ये कोणताही नेता पुढील एकनाथ शिंदे ठरु शकतो. कदाचित त्यांचा मुलगा केटीआर किंवा मुलगी (के कविता) किंवा त्यांचा पुतण्या (हरिस राव) सुद्धा एकनाथ शिंदे बनू शकतात. (BJP)

संजय पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री केसीआर यांना भाजपा राष्ट्रीय कार्यकारीणी बैठकीत काय झाले हे कसे कळले ? भाजपाकडे कोणतेही धोरण नाही, असे सांगताना तुम्ही एका राज्याचे मुख्यमंत्री आहात हे लक्षात ठेवा. भाजपाकडे काही धोरण नसेल तर भाजपा 18 राज्यांमध्ये सत्तेत कशी आहे ? मुख्यमंत्र्यांची भाषा फारच लज्जास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्यात मोठा फरक आहे.

 

संजय यांनी केसीआर यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही देशाचे नेते आहात का ? तुम्ही स्वत:ची मोदींसोबत तुलना करता का ? मोदी दिवसातून 18 तास काम करतात.
तर तुम्ही (केसीआर) फार्महाऊसमधूनही बाहेर पडत नाही.
तुम्ही स्वत:ला देशाचे नेते म्हणून घेतल्यापासून लोक तुमच्यावर हसत आहेत.

 

Web Title :-  BJP | several eknath shindes in trs telangana bjp chief hits out at kcr

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा