मुख्यमंत्रिपदाचा अंतिम निर्णय ‘हे’ ३ नेतेच घेणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपने युती केली. त्यांना त्यात यशही मिळालं. आता लोकसभा निवडणुकांनंतर आता या पक्षांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे, कोणाची सत्ता येणार याचे. त्यात मुख्यमंत्री कोणाचा होणार शिवसेना कि भाजप याची अधिक उत्सुकता सर्वांना लागली आहे.

शिवसेनेने लोकसभेवेळी केलेल्या युतीवेळी ठेवलेल्या अटींमध्ये एक अट अशीही होती की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असावा, असे म्हटले जात होते. मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर भाजपचीही नजर मुख्यमंत्री पदावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री कोण होणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा हे तीन नेतेच मुख्यमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे मत व्यक्त केले. आमच्यासाठी CM म्हणजे कॉमन मॅन असा अर्थ आहे. आषाढी एकादशीस उद्धव ठाकरे आणि सीएम एकत्रित महापूजा करतात. असं का याविषयी माहिती नाही, पण जर ते जात असतील तर चांगलंच आहे. युती होणार आहेच, युतीच्या नेत्यांनी एकत्रित विठ्ठलाची पूजा केली तर चांगलेच, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावरही मुनगंटीवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसची जनमानसातली प्रतिष्ठा संपली आहे. त्यांची विश्वसनीयता राहिली नाही त्यामुळे मनसे काँग्रेससोबत गेली तरीही काहीही फरक पडणार नाही, असंही त्यांनी यावेळी सुचित केले. तसंच काँग्रेसमधील राजीनामा सत्रावरही त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. काँग्रेसमधील लोकांची मानसिकता पराभवाची झाली आहे. राजीनामा द्यायचं कारणच नव्हते, यश अपयश हे चालत राहतं, काँग्रेसला सत्तेची चटक लागली, त्यांना सत्ता विरह सहन करता येत नाही. लोकशाहीसाठी विरोधी पक्ष चांगला असला पाहिजे. काँग्रेस जिवंत राहीली पाहिजे ही आमची इच्छा आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

महिलांनो, आरोग्यासाठी चांगल्या पॅकेज्ड फूड्सची निवड अशी करा

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे